Betrayal Indian history: एकाच्या दगाबाजीने बदलला देशाचा इतिहास; कोण होता तो गद्दार राजा?

Surabhi Jayashree Jagdish

गद्दार राजा

भारतात पराक्रमी राजांबरोबरच काही गद्दार राजेही होते, असा इतिहास सांगतो त्यांच्या गद्दारीमुळे भारताला गुलामगिरीची किंमत चुकवावी लागली. अशा राजांमध्ये राजा जयचंद यांचे नाव विशेषत्वाने घेतले जाते.

राजा जयचंद

जयचंदाच्या गद्दारीमागे एक कारण असंही सांगितलं जातं की, पृथ्वीराज चौहान यांनी जयचंदाची कन्या संयोगिता हिला स्वयंवरातून पळवून नेलं होतं. या घटनेमुळे जयचंद अत्यंत संतप्त झाला होता. त्यामुळे त्याने पृथ्वीराजविरुद्ध कट रचण्याचा निर्णय घेतला.

पृथ्वीराज चौहान

पृथ्वीराज चौहान दिल्लीचा राजा झाल्यानंतर जयचंद हे फारच नाराज झाले होते. त्यांना वाटलं की, त्याचा अपमान झाला आहे. त्यामुळे त्याने पृथ्वीराजविरुद्ध गद्दारी करण्याचा निश्चय केला.

कट्टर शत्रू

या दोन प्रमुख कारणांमुळे जयचंद पृथ्वीराज चौहानचा कट्टर शत्रू बनला. त्याने सूड घेण्याचा निर्धार केला आणि त्यासाठी योग्य संधीची वाट पाहू लागला. ही वैयक्तिक वैरभावना पुढे इतिहासात मोठ्या घडामोडींचे कारण ठरली.

मोहम्मद गोरीशी मैत्री

जयचंदाने मोहम्मद गोरीशी मैत्री केली आणि त्याला भारतावर आक्रमण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. जेव्हा गोरीने दिल्लीवर हल्ला केला, तेव्हा जयचंदाने त्याला साथ दिली. ही घटना इतिहासात जयचंदाच्या गद्दारीचे उदाहरण म्हणून ओळखली जाते.

दोन वेळा लढाई

मोहम्मद गोरी आणि पृथ्वीराज यांच्यात दोन वेळा लढाई झाली होती. पहिल्या लढाईत पृथ्वीराज चौहान विजयी झाले होते. ही गोष्ट जयचंदाला फारच खटकली होती.

का लागला गद्दारीचा आरोप?

दुसऱ्या लढाईत पृथ्वीराज पराभूत झाले आणि जयचंदाने त्याला मदत न करता गोरीची बाजू घेतली. ही लढाई पृथ्वीराजच्या पराभवाचं कारण ठरली असं मानलं जातं. त्यामुळे जयचंदावर गद्दारीचा आरोप अधिक बळावला.

ठोस पुरावे नाहीत

काही लोकांचं असंही म्हणणं आहे की, जयचंदाने मोहम्मद गोरीला मदत केली याचे ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्याला गद्दार म्हणणं हे ऐतिहासिकदृष्ट्या संपूर्णपणे सिद्ध झालेले नाही.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

येथे क्लिक करा