Surabhi Jayashree Jagdish
जमीन खरेदीचे विक्रीचे व्यवहार जर आज करणार असाल तर दिवस अनेक चांगल्या संधी घेऊन आलेला आहे.
कलाकारांना विशेष लाभ मिळणारा आजचा दिवस आहे. जवळच्या प्रवासामधून फायदा होणार आहे.
जोडीदाराच्या तब्येतीची आज काळजी घ्यावी लागेल. वैवाहिक सुखामध्ये विनाकारण अडचणी येण्याचा आजचा दिवस आहे.
प्रवासाचे योग आज आपल्या नशिबात आहेत. आपल्या चांगल्या स्वभावामुळे इतरांचे मन जिंकाल.
परदेश गमनाच्या काही गोष्टी असतील तर त्याच्या बैठका पार पडतील किंवा नियोजन होईल. मात्र दैनंदिन कामांमध्ये अडथळे येण्याचा संभव आहे.
आपल्या जवळच्या लोकांकडून आपल्यावर प्रेमाचा वर्षाव होईल. पुढील महत्त्वाच्या गोष्टीचे आयोजन नियोजनासाठी एकत्र भेटणे होईल.
करिअरला वेगळी कलाटणी मिळेल. समाजकारण, राजकारणामध्ये विशेष प्रगती आहे. आपली असणारी पत समोरचा ओळखून विशेष मान सन्मान पदरी पडणार आहेत.
कलासक्त जीवन जगण्याचा प्रयत्न कराल. अनेक ठिकाणी व्यवधान ठेवून कामे कराल. आपल्या महत्त्वाच्या क्षेत्रात प्रगती साधनाचा आजचा दिवस आहे.
समाधानी आणि सात्विक असणारी आपली जरी रास असली तरी विभागाच्या व्यवहाराच्या दृष्टीने आज जपून पावले टाकावीत.
व्यवसायामध्ये अनेक दिवस रेंगाळत पडलेल्या गोष्टी आज सहज आणि सुकर होतील. कष्टाला पर्याय नाही हे पुन्हा नव्याने जाणवेल.
आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे. नोकरीमध्ये गती आणि प्रगती दिसते आहे. मात्र लहान अडचणींवर मात करून पुढे जावे लागेल.
उपासनेला विशेष दिवस चांगल्या संधी घेऊन आलेला आहे. आपल्यातील सुजनशिलता वाढीस लागेल.