साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री माधुरी दीक्षितला धकधक गर्ल या नावाने ओळखले जाते.
१९९२ साली प्रदर्शित झालेला बेटा हा चित्रपट माधुरीच्या करियरमधील एक महत्त्वपूर्ण चित्रपट आहे.
या चित्रपटामध्ये माधुरी दीक्षितवर एक गाणे चित्रीत करण्यात आले होते.
'धकधक करने लगा' असे या गाण्याचे नाव होते.
मराठी सिनेमासृष्टीतील अप्सरा म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नटरंग ह्या चित्रपटामध्ये 'अप्सरा आली' ही लावणी सादर केली होती.
चित्रपटातील या गाण्याला प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली.
यानंतर सोनाली कुलकर्णी तिच्या चाहत्यांची अप्सरा झाली.
मराठमोळ्या रिंकू राजगुरूची ओळख आजही आर्ची म्हणूनच आहे.
एका मराठी सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली रिंकू तरूणांना सैराट करून आर्ची झाली.
प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या सैराट या चित्रपटात रिंकूने आर्ची ही भूमिका साकारली होती.
अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या नृत्यकलेने नेहमीच प्रेक्षकांना आणि चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.
चंद्रमुखी या चित्रपटात अमृताने पहिल्यांदा मुख्य आव्हानात्मक भूमिका साकारली.
सिनेमातील चंद्रा या बहारदार गाण्यावर अभिनेत्री अमृता खानविलकरने सुंदर लावणी सादर केली.
यामुळेच तिला चंद्रा म्हणून ओळखले जाते.