Alisha Khedekar
लहानपणापासून ठसका लागला की वर पाहा, असं मोठी माणसं सांगायची. ही घराघरात चालत आलेली सवय आहे.
अन्न किंवा पाणी चुकीच्या मार्गाने घशात गेल्याने अचानक खवखव होते आणि जोरात खोकला येतो.
वर पाहिल्याने ठसका थांबतो, पण याचा ठोस वैज्ञानिक पुरावा नाही.
ठसका कमी झाल्यावर पाणी पिणे घसा शांत करण्यास मदत करू शकते.
अन्ननलिकेत अडकलेला अन्नाचा कण किंवा द्रव बाहेर काढण्यासाठी खोकण्याची नैसर्गिक प्रक्रिया वापरते. खोकला जबरदस्तीने थांबवू नका.
श्वास घेण्यास त्रास, बोलता न येणे किंवा सतत गुदमरल्यासारखे वाटत असल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा