Chetan Bodke
सध्या मराठी टेलिव्हिजनसृष्टीत ‘आई कुठे काय करते’ याची कमालीची चर्चा सुरू आहे.
लवकरच या मालिकेत एका नव्या अभिनेत्रीची एन्ट्री होणार आहे.
लवकरच मालिकेत आशुतोष केळकरच्या बहिणीची मालिकेत एन्ट्री होणार आहे.
आशुतोषची बहिण मालिकेत अनिरुद्धची बिझनेस पार्टनर म्हणून देखील दिसणार आहे.
वीणाची एन्ट्री मालिकेत अनिरुद्धची पार्टनर म्हणून होत असल्याने नक्कीच अरुंधती आणि आशुतोषच्या खासगी आयुष्यात काही वादळ निर्माण होणार का पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मालिकेत वीणाचे पात्र अभिनेत्री खुशबू तावडे साकारत आहे.
‘देवयानी’फेम अभिनेता संग्राम समेळ आणि खुशबू पती पत्नी आहेत. त्यांना एक मुलगा देखील आहे.
झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेतील मुख्य अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि खुशबू या दोघी सख्ख्या बहिणी आहेत
अभिनेत्री गेली अनेक वर्ष मराठी मालिका विश्वात कार्यरत असून टेलिव्हिजनसृष्टीतील अभिनयाने खुशबू तावडे हिने सर्वांचीच मनं जिंकले.