Chetan Bodke
गायिका आणि कॉमेडियन सुगंधा मिश्राने नुकतंच चाहत्यांना बेबीबंप फोटोशूट करत ‘गोड बातमी’ दिली आहे.
‘कपिल शर्मा शो’ फेम कपल सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले हे लग्नाच्या दोन वर्षानंतर आई-बाबा होणार आहेत.
संकेत आणि सुगंधा मिश्राने आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी १५ ऑक्टोबर २०२३ (रविवार) दिली आहे. मॅटर्निटी फोटोशूट करत माहिती दिली.
सुगंधाने ‘कोणीतरी लवकरच येत आहे. आम्ही अजिबात वाट पाहू शकत नाही. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच राहू द्या.’ असं म्हणत पोस्ट शेअर केली आहे.
सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसले यांनी एप्रिल २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली असून ते दोघेही पेशाने सेलिब्रिटी आहेत.
सुगंधाला ‘कपिल शर्मा शो’ मधून प्रसिद्धी मिळाली असून पती संकेत याला ही काही मालिकेच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळाली. त्यासोबतच अभिनेता पेशाने डॉक्टर आहे.
सुगंधाने ‘हिरोपंती’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते.
कायमच सुगंधा सोशल मीडियावर आपल्या हटक्या अंदाजातील फोटोंमुळे चर्चेत असते.