Chetan Bodke
टेलिव्हिजन अभिनेत्री आणि निर्माती श्वेता शिंदे नेहमीच आपल्या खास अंदाजातील फोटोंमुळे चर्चेत असते.
श्वेता शिंदे कायमच सोशल मीडियावर चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर नवरात्रीनिमित्त खास फोटोशूट शेअर केलं आहे.
आज दुसरी माळ असून आजचा रंग पांढरा आहे. श्वेताने पांढऱ्या रंगातील साडीचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.
दरम्यान, अभिनेत्रीने पांढऱ्या रंगाची पैठणी नेसून खुप सुंदर फोटोशूट शेअर केलं आहे. फोटोंमधील अभिनेत्रीच्या सौंदऱ्याची सध्या चर्चा होत आहे.
ऑतिच्या पैठणीवर सोनेरी रंगाची बारीक डिझाईन असून काठावर मोराचीही सुंदर डिझाईन दिसत आहे.
‘गोष्ट एका पैठणीची’ अशी कॅप्शन देत श्वेताने फोटो शेअर केले आहे.
ग्लॉसी मेकअप, गजरा आणि लूकला साजेसा शृंगार करत अभिनेत्रीने फोटो शेअर केले.
सध्या सोशल मीडियावर श्वेता शिंदेच्या नव्या फोटोंची प्रचंड चर्चा होत आहे.