Teeth Grinding in Sleeping: रात्री झोपेत दात किटकिटतात? वेळीच ओळखा 'ही' लक्षणं, जाणून घ्या उपाय

Shruti Vilas Kadam

ताण आणि चिंता

ताण, चिंता किंवा मानसिक अस्वस्थतेमुळे झोपेत नकळत दात घट्ट दाबले किंवा घासले जाऊ शकतात.

stress | pinterest

झोपेच्या समस्या

घोरणे, झोपेत वारंवार जाग येणे किंवा स्लीप अॅपनियासारख्या समस्या असल्यास झोपेत दात किटकिटतात.

sleep | pinterest

सकाळी जबड्यात दुखत असेल तर सावध व्हा

सकाळी उठल्यावर जबडा दुखणे, डोकेदुखी, दात उकळत किंवा दात झिजलेले दिसत असतील तर ही ब्रुक्सिझमची लक्षणे असू शकतात.

कॅफिन आणि अल्कोहोल कमी करा

जास्त कॅफिन आणि अल्कोहोल तसेच धूम्रपानामुळे रात्री दात किटकिटतात. त्यामुळे विशेषतः रात्रीच्या वेळी कॅफिनचे सेवन कमी करणे फायदेशीर ठरू शकते.

Coffee | yandex

झोपण्यापूर्वी रिलॅक्स व्हा

झोपण्यापूर्वी दीर्घ श्वसन, हलका व्यायाम, शांत गाणी आणि नियमित झोपेची वेळ यामुळे शरीर-मन रिलॅक्स होण्यास मदत होऊ शकते.

Breathing exercises | pinterest

दात आणि जबड्याला आराम द्या

दात दुखत किंवा जबड्यात वेदना असल्यास च्युइंग गम आणि कठीण पदार्थ चघळणे टाळा. दिवसभर दात घट्ट दाबून ठेवण्याची सवय असल्यास जबडा सैल ठेवण्याचा सराव करा.

teeth | yandex

गरज असल्यास डेंटिस्टचा सल्ला घ्या

दातांची झीज, संवेदनशीलता किंवा जबड्यात वेदना असल्यास डेंटिस्टचा सल्ला नक्की घ्या.

Home Health Check | saam tv

डिस्क्लेमर

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टीव्ही या माहितीची पूर्ण सत्यता किंवा अचूकतेची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

sleep time | pinterest

Cycling Benefits: लहानपणीचा खेळ होईल वजन कमी करण्याचं निमित्त, जीममध्ये खूप मेहनत नाही ३० मिनिटं करा सायकलिंग

Cycling Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा