साम टिव्ही ब्युरो
फोन हा केवळ संदेश आणि कॉल यापुरता मर्यादित राहिलेला नाही.
आजकाल आपण सारेजण खास क्षणाचे टिपलेले फोटो फोनच्या गॅलरीत सेव्ह करतो जे आपल्यासाठी खूप खास असतात.
आपल्या स्वताच्या फोनमध्ये आपले न मोजता येणार इतके फोटो असतात.
अनेकदा फोन गॅलरीत सेव्ह केलेले हे फोटो चुकून डिलीट होतात. आपल्याला आवडत असलेला फोटोच आपल्या हातून नकळत डिलीट होतो.
यासह एका ठरावीक काळानंतर जागेअभावी देखील डिलीट होतात.
मात्र आता काळजी करायचे काही कारण नाही. आज आम्ही तुम्हाला डिलीट झालेले फोटो परत कसे मिळवायचे हे सांगणार आहोत.
अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये फोनवरून हटवलेले फोटो रिकव्हर करणे खूप सोपे आहे.
गूगलने Recently Deleted, Recycle Bin, Trash Bin अशी ऑपरेटिंग सिस्टीम प्रदान केली आहे.
हे फीचर अँड्रॉइड फोनच्या फोटो गॅलरी ॲपमध्ये समाविष्ट केले आहे, ज्याचे काम मुख्य फोल्डरमधून डिलीट झालेले फोटो सांभाळून ठेवणे आहे.
या फोल्डरमधील फोटोंमधून तुम्हाला एखादा फोटो पुन्हा परत मिळवायचा असेल तर फोटो निवडा आणि रिकव्हर बटण दाबा.