ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मोबाईल फोन हे आपल्या प्रत्येकासाठी सध्या महत्वाचं गॅझेट ठरतंय. एकाचवेळी आपण आपल्या मोबाईलमध्ये अनेक कामं करत असतो.
मोबाईलवर ऑनलाईन अॅक्टिविटी करत असताना तसंच ब्राउझिंग करत असताना अनेक जंक फाइल्स फोनमध्ये स्टोर होत राहतात.
फोनमध्ये साचणाऱ्या जंक फाइल्ससोबतच Cache आणि काही डाउनलोड कुकीजमुळे मोबाईल स्लो होत असतो. अनेकदा एखाद्या महत्वाच्या कामाच्या वेळीच मोबाईल हँग होतो आणि तुमची चिंता वाढते.
काही स्मार्टफोनमध्ये स्वत:ची ट्रॅश सिस्टम असते. जिच्या मदतीने तुम्ही फोनमधील नको असलेल्या कॅशे फाईल्स आणि डाउनलोड फाईल्स डिलीट करू शकता.
Android मध्ये रिसायकल बीन नसल्याने अनेक डिलीट केलेल्या फाइल्सही स्टोर होत असल्याने फोन स्लो होतो.
सर्वप्रथम Android स्मार्ट फोनमधील Google Photos App ओपन करा. यात Library पर्यायावर क्लिक करा.
यानंतर Library मधील Trash या ऑप्शनवर क्लिक करा. उजव्या बाजुला दिसणाऱ्या तीन डॉटवर क्लिक करा.
इथं 'Empty Trash' चा पर्याय सिलेक्ट करा. इथं तुम्हाला Allow वर क्लिक करायचं आहे. यामुळे तुमच्या स्मार्टफोनमधील गुगलवरील फोटो कायमचे डिलीट होतील.
जर तुम्ही गुगल फाइल्स File Manager मध्ये स्टोर करत असाला तर तुम्ही इथंही ट्रॅश क्लियर करू शकता. फोनमध्ये गुगुल अॅपची फाईल सिलेक्ट करा. वर डाव्या बाजुला असलेल्या Hamberger Menuवर क्लिक करा.