Priya More
बॉलिवूडमध्येही विद्यार्थी आणि शिक्षक यांच्या नात्यावर आधारीत अनेक चित्रपट तयार करण्यात आले आहेत.
१९७२ साली प्रदर्शित झालेल्या 'परिचय' चित्रपटामध्ये मेंजीतेंद्र ५ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतात.
२०१० साली प्रदर्शित झालेल्या 'दो दूनी चार' या चित्रपटात दिवंगत अभिनेते ऋषी कपूर हे शिक्षकाच्या भूमिकेत होते.
'इकबाल' चित्रपटामध्ये श्रेयस तळपदे उत्कृष्ट क्रिकेटरच्या भूमिकेत आहे. तर नसीरुद्दीन शाह हे त्याला मार्गदर्शन करतात.
'ब्लॅक' चित्रपटामध्ये अभिनेत्री राणी मुखर्जी विद्यार्थिनीच्या आणि अमिताभ बच्चन हे शिक्षकाच्या भूमिकेत आहेत.
आमिर खानचा सुपरहिट चित्रपट 'तारे जमीन पर' शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर आधारीत आहे.
'स्टेनली का डब्बा' या चित्रपटामध्ये देखील शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर नजर टाकण्यात आली आहे.
अभिनेत्री राणी मुखर्जीचा 'हिचकी' चित्रपट देखील सुपरहिट ठरला. हा चित्रपटही विद्यार्थी आणि शिक्षकांच्या नात्यावर आधारीत आहे.
आमिर खानचा 'थ्री इडियट्स' चित्रपट सुपरहिट ठरला. या चित्रपटमध्ये बोमन ईराणी शिक्षकाच्या भूमिकेत आहेत.
संजय दत्तचा सुपरहिट चित्रपट 'मुन्नाभाई एमबीबीएस'चा देखील या लिस्टमध्ये समावेश आहे.
शाहिद कपूरचा 'पाठशाला' चित्रपट शिक्षण व्यवस्थेवर आधारीत आहे.