Manasvi Choudhary
आपल्यापैकी अनेकजण दिवसाची सुरूवात एक चुस्की चहा किंवा कॉफीने करतात.
चहा आणि कॉफी दोन्हीमध्ये कॅफिन असते, त्यामुळे त्यांचा शरीरावर परिणाम होऊ शकतो यासाठी कॅफिनचे प्रमाण, साखरेचा वापर आणि दिवसातून किती वेळा चहा पिताय हे देखील महत्त्वाचे असते.
चहा आणि कॉफीचा आरोग्यावर कसा परिणाम होतो अधिक प्रमाणात प्यायल्यास काय होते जाणून घ्या.
चहामध्ये कॅफीनसोबतच निकोटीनचे प्रमाणही असते, ज्यामुळे चहाची तुम्हाला सवय लागते. तर , कॉफीमध्ये फक्त कॅफीन असते.
चहा आरोग्यासाठी कॉफीपेक्षा अधिक हानिकारक ठरू शकतो. ज्यामुळे ॲसिडिटी, पोटात जळजळ आणि पचनाचे विकार होतात.
१) वजन कमी करण्यासाठी कॉफी फायदेशीर आहे.
२) ब्लॅक कॉफी प्यायल्याने शरीराचे मेटाबोलिज्म वाढते यामुळे वजन कमी होते.
जर तुम्हाला थकवा कमी करायचा असेल तर तुम्ही चहा आणि कॉफी दोन्हींचे सेवन करू शकता.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे.अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.