Tata Harrier Launch: टाटा हॅरियर नव्या फीचर्ससह लॉन्च! कमी किंमतीत स्मार्ट फीचर्स

Dhanshri Shintre

हॅरियर अ‍ॅडव्हेंचर एक्स

टाटा मोटर्सने आज त्यांच्या प्रसिद्ध SUV हॅरियरचे नवीन अ‍ॅडव्हेंचर एक्स आणि एक्स प्लस व्हेरिएंट्स बाजारात सादर करत ग्राहकांना नवीन पर्याय दिले.

किंमत

टाटा हॅरियरच्या नव्या प्रकाराची प्रारंभिक किंमत १८.९९ लाख रुपये ठेवण्यात आली असून हे ‘X’ बॅज मॉडेल पूर्वीच्या अ‍ॅडव्हेंचर प्रकाराची जागा घेईल.

किती किमतीने कमी

या नव्या व्हेरिएंटमध्ये आकर्षक फीचर्स असून, पूर्वीच्या अॅडव्हेंचर व्हेरिएंटच्या तुलनेत त्याची किंमत सुमारे ५५,००० रुपयांनी कमी आहे.

पॉवर

अॅडव्हेंचर एक्स ट्रिममध्ये २.० लिटर डिझेल इंजिन आहे, जे १७० बीएचपी पॉवर देत ६-स्पीड मॅन्युअल व टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्सशी जोडले आहे.

थीमची सुविधा

अ‍ॅडव्हेंचर एक्स ट्रिममध्ये सीव्हीड हिरवा एक्सटीरियर (टॉप व्हेरियंटमध्येही) आणि खास ड्युअल-टोन ब्लॅक-टॅन इंटीरियर थीमची सुविधा दिली आहे.

अतिरिक्त सुविधा

फीचर्स आणि सेफ्टीच्या दृष्टीने, नवीन अ‍ॅडव्हेंचर एक्स ट्रिममध्ये ऑटो वाइपरची अतिरिक्त सुविधा असून इतर सर्व फीचर्स पूर्वीप्रमाणेच आहेत.

फीचर्स

यामध्ये १७-इंच अलॉय व्हील्स, पॅनोरॅमिक सनरूफ, ३६०-डिग्री कॅमेरा, १०.२५-इंच टचस्क्रीन, डिजिटल क्लस्टर आणि ६ एअरबॅग्जसह अनेक फीचर्स आहेत.

खास वैशिष्ट्ये

अ‍ॅडव्हेंचर एक्स+ मध्ये मागील डिस्क ब्रेक, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेकसह ऑटो होल्ड आणि लेव्हल २ एडीएएस सूटसारखी खास वैशिष्ट्ये दिली आहेत.

किंमत

हॅरियर अ‍ॅडव्हेंचर एक्स व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १८.९९ लाख रुपये असून, अ‍ॅडव्हेंचर एक्स+ ची किंमत १९.३४ लाख रुपये आहे.

NEXT: गाडीसाठी खास व्हीआयपी नंबर कसा मिळवावा? सोपी पद्धत आणि फी

येथे क्लिक करा