साम टिव्ही ब्युरो
हॉटेलात नको, आपण मॅक् डीमध्ये जाऊन फ्रेंच फ्राईज खाऊ, असं घराघरात सर्रास बोललं जातं.
घरी बनवायचे तर, मॅक डीसारखं ते होत नाही, असा संवाद ऐकायला मिळतो.
पण आम्ही तुम्हाला सांगतोय, घरी आणि ते पण चटपटीत फ्रेंच फ्राईज कसे बनवायचे. पाहूयात.
बटाटे उभ्या आकारात पातळ कापून घ्या. ते पाण्यात स्वच्छ धुवा.
यानंतर त्यात विनेगर टाकून काही वेळ कोमट पाण्यात ठेवावेत.
ज्यामुळे कापलेले बटाटे काळे पडत नाहीत.
भिजत टाकलेले बटाटे एका भांड्यात काढून त्यावर मैदा, कॉर्नफ्लॉवर, मीरपूड टाकून मिश्रण करा
गॅसवर कढईत तेल गरम करून उकळत्या तेलात मिश्रित केलेले बटाटे सोडून कुरकुरीत होईपर्यत तळून घ्या.
यानंतर गरमागरम, चटपटीत फ्रेंच फ्राईजवर चवीप्रमाणे मीठ, पेरीपेरी मसाला, चाट मसाला टाका
फ्रेंच फ्राईज तुम्ही चीझ डिप किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता.