Surabhi Jayashree Jagdish
मालवण तालुक्यात असलेले तारकर्ली हे कोकणातील एक सुंदर आणि शांत ठिकाण आहे
स्वच्छ समुद्रकिनारे आणि 'मिनी गोवा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गासाठी प्रसिद्ध आहे.
तारकर्लीचा मुख्य किनारा त्याच्या पांढऱ्याशुभ्र वाळूसाठी आणि स्वच्छ पाण्यामुळे ओळखला जातो. पावसाळ्यात इथे गर्दी कमी असते आणि समुद्राचे शांत पण दमदार रूप अनुभवता येते.
कर्ली नदी आणि अरबी समुद्राच्या संगमावर असलेले हे बॅकवॉटर तारकर्लीचे एक प्रमुख आकर्षण आहे. पावसाळ्यात खाडीच्या दोन्ही बाजूला हिरवीगार वनराई अधिकच दाट होते
कर्ली नदी अरबी समुद्राला मिळते, तो ठिकाण म्हणजे देवबाग संगम. पावसाळ्यात नदीचे आणि समुद्राचे पाणी एकत्र येतानाचे दृश्य खूप आकर्षक असते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा भव्य किल्ला अरबी समुद्रात एका बेटावर वसलेला आहे. पावसाळ्यात किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बोटींचा प्रवास करावा लागतो.
तारकर्लीपासून जवळच असलेल्या रेडी गावात हे प्रसिद्ध गणपती मंदिर आहे, जिथे स्वयंभू गणपतीची मूर्ती आहे.