Tara Sutaria: लाल इश्क...; तारा सुतारियाचा बनारसी साडीतील रॉयल लूक

Shruti Vilas Kadam

तारा सुतारिया

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया (Tara Sutaria) ने अलीकडेच केलेल्या फोटोशूटमध्ये पारंपरिक बनारसी साडीतील तिचा लुक सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

Tara Sutaria

लाल बनारसी साडी

तिने परिधान केलेली लाल बनारसी साडी सोन्याच्या जरी वर्क आणि जाळीदार डिझाइनने सजलेली आहे, यामध्ये तारा अगदी नवनवरी दिसत आहे.

Tara Sutaria

हाफ स्लिव्ह ब्लाउज

या पारंपरिक साडीसोबत तिने हाफ स्लिव्ह ब्लाउज घातला असून त्यावरही सोन्याचे वर्क केलेले आहे. त्यामुळे संपूर्ण लुकला आकर्षक चमक आली आहे.

Tara Sutaria

दागिने

तिने आपल्या लुकला पूरक असा हिरवा एमराल्ड चोकर नेकलेस, कुंदन ईयररिंग्स आणि लाल-हिरव्या रंगाचे कंगन घातले आहेत, ज्यामुळे पारंपरिकतेला रॉयल टच मिळतो.

Tara Sutaria

मिनिमल लुक

तारा सुतारियाने मेकअपमध्ये मिनिमल लुक निवडला आहे. न्यूड लिपस्टिक, काजळ, आणि लाल बिंदीने तिचा चेहरा अधिक उठून दिसतो.

Tara Sutaria

हेअरस्टाईल

केसांना तिने पारंपरिक लो बन स्टाईल दिली असून गजऱ्याने त्याची सजावट केली आहे. त्यामुळे ती अगदी नववधूप्रमाणे दिसत आहे.

Tara Sutaria

चाहत्यांचे प्रेम

चाहत्यांनी तिच्या या फोटोशूटचं प्रचंड कौतुक केलं आहे. अनेकांनी सोशल मीडियावर कमेंट करत “तारा सुतारिया दिसतेय अगदी रॉयल ब्राइडसारखी!” असं लिहिलं आहे.

Tara Sutaria

Shahrukh Khan: 'मन्नतमधील रुम भाड्याने मिळेल का?' चाहत्याच्या प्रश्नावर शाहरुखचं मिश्कील उत्तर

ShahRukh Khan | Social Media
येथे क्लिक करा