Priya More
तांब्याच्या भांड्यात ६ ते ८ तास रात्रभर ठेवलेले पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. हे पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते. पित्त, अल्सर आणि पोटातील गॅसाशी संबंधित समस्या दूर होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने पोटातील जंतूंचा नाश होतो. तुम्हाला जळजळ होत असेल तर ही समस्या दूर होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. या पाण्यामुळे पोट देखील स्वच्छ होते.
तुम्हाला जर पित्ताचा त्रास होत असेल तर तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे हा त्रास दूर होईल.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीराच्या आतील जखमा भरून निघण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात. चेहऱ्यावर नवीन त्वचा निर्माण करण्यास मदत होते.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे रक्तदाबावर नियंत्रण राहते. हृदयाला रक्तपुरवठा सुरळीत होतो.
तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्यामुळे सांधेदुखी आणि थायरॉइडशी संबंधित समस्येपासून आराम मिळतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. साम टिव्ही याचं समर्थन करत नाही.