Chetan Bodke
तुम्ही आम्ही आपण सर्वच दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने पिऊन करतो. अनेक जण ते न प्यायल्याशिवाय आपल्या दिवसाची सुरूवातच करत नाहीत.
आज आम्ही तुम्हाला असे पेय सांगणार आहोत, जे तुम्ही पिऊन आपल्या दिवसाची सुरूवात करू शकता.
चहा किंवा कॉफी ऐवजी तुम्ही ग्रीन टी सुद्धा पिऊ शकता. ग्रीन टी प्यायल्याने वजन नियंत्रणात राहते आणि शरीरातील पचनक्रिया व्यवस्थित राहते.
लिंबू पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, वजनही कमी होण्यास मदत होते. त्यासोबतच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठीही मदत होते.
नारळ पाणी सकाळी प्यायल्याने शरीरासाठी उत्तम राहते. त्यामुळे कायमच शरीर शरीर हायड्रेट राहते.
चहाऐवजी ब्लॅक कॉफीचे सेवन केल्याने वजन नियंत्रणात राहते. ब्लॅक कॉफी प्यायल्याने आपली चयापचय क्रिया उत्तम राहते. सोबतच शरीरातील आळसही दुर होतो.
लेमन टी प्यायल्याने पोट भरलेलं वाटतं. त्यासोबतच स्कीन संबंधित आजारही दुर राहतात. तसेच पोटासंबंधित समस्याही दुर होतात.
कोमट पाण्यात हळद आणि काळी मिरी टाकून प्यायल्याने चयापचय संस्था संतुलित राहते आणि शरीराती फॅट्सही कमी होऊ शकतात.
पाण्यामध्ये ओवा आणि जिरे घाला आणि मंद आचेवर पाणी उकळा. त्यानंतर हे पाणी गाळून प्या. यामुळे पचनासंबंधित समस्या आणि वजन नियंत्रणात राहते.
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.