Chetan Bodke
सध्या हिवाळा ऋतु सुरु आहे. दिवसेंदिवस थंडीचा कडाका वाढताना दिसत आहे.
थंडाव्यामुळे त्वचेसंबंधित अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावं लागतं.
हिवाळ्यामध्ये आपल्याला कोरड्या त्वचेची (Dry Skin) आणि ऑईली स्कीनचीही कशी काळजी घ्यावी याच्या टीप्स जाणून घेऊया.
हिवाळा ऋतू सुरू होताच चेहऱ्यावर अनेक समस्या दिसतात. आपला सुंदर आणि व्यवस्थित चेहरा दिसण्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायझ वापरावे.
रोज शक्य तितके पाणी प्यावे. पाण्याचे जास्त सेवन केल्यामुळे चेहरा नेहमीच फ्रेश राहतो.
चेहरा सुंदर आणि नितळ ठेवण्यासाठी मलाईचा वापर करावा, चेहऱ्याला मलाई लावल्यामुळे चेहरा खूपच सुंदर दिसतो.
आपण नेहमीच चेहऱ्यावर घरगुती उपाय करतो. जर मुलतानी माती आणि गुलाबजल लावून चेहरा साफ केल्यास चेहरा सुंदर दिसतो.
मध, हळद, बेसन आणि दूध याचं एकत्रित मिश्रण लावून चेहऱ्यावर जर लावलं तर चेहरा खूपच सुंदर दिसतो.
सदर लेख फक्त माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.