Dhanshri Shintre
जगातील आठवे आश्चर्य म्हणून ओळखली जाणारी ही इमारत तिच्या अद्वितीय सौंदर्य, वास्तुकले आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे.
ताजमहालाचे अप्रतिम सौंदर्य पाहण्यासाठी आणि त्याच्या इतिहासाचा अनुभव घेण्यासाठी जगभरातील पर्यटक आग्र्याला भेट देतात.
ताजमहालाच्या शिखरावर पूर्वी ४६६ किलो वजनाचा सोन्याचा कळस होता, जो नंतर सुरक्षा कारणास्तव काढण्यात आला.
ताजमहालावरील सोन्याचा कळस आता दिसत नाही, कारण तो अनेक वर्षांपूर्वी बदलून त्याऐवजी कांस्य कळस बसवला गेला.
ताजमहालावरील बेशकिमती सोन्याचा कळस गायब झाल्यानंतर, तो नेमका कुठे गेला याबद्दल आजही रहस्य कायम आहे.
ब्रिटिश अधिकारी जोसेफ टेलरने ताजमहालावरील सोन्याचा कळस उतरवून तो ब्रिटनला नेल्याचे इतिहासात नमूद आहे.
सन 1810 मध्ये ताजमहालावरील मूळ सोन्याचा कळस बदलून तांब्याचा कळस बसवण्यात आला, ज्यावर सोन्याचा मुलामा चढवला गेला.