Tarak Mehta Birth Anniversary: 'दुनिया ने उंधा चष्मा' खऱ्या आयुष्यातील तारक मेहताची आहे रंजक कहाणी

साम टिव्ही ब्युरो

गुजराती भाषेतील एक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखक म्हणजे तारक मेहता. तारक मेहता यांचा जन्म २६ डिसेंबर १९२९ रोजी अहमदाबादमध्ये झाला.

Tarak Mehta Birth Anniversary: | Saam Tv

अहमदाबादमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते मुंबईत आले .

Tarak Mehta Birth Anniversary: | Saam Tv

मुंबईतील खालसा महाविद्यालयातून त्यांनी गुजराती विषयात बी.ए केलं. त्यानंतर 1958 साली भवन्स महाविद्यालयातून एम.ए पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. 

Tarak Mehta Birth Anniversary: | Saam Tv

तारक मेहता यांच्या लोकप्रिय साहित्यात 'दुनियाने उंधा चष्मा', 'तारक मेहताना आठ एकांकियो', 'तारक मेहताना उंधा चष्मा', 'तारक मेहतानो टपुडो' 'तारक मेहतानी टोकळी परदेसना प्रवासे' यांचा समावेश करता येईल.

Tarak Mehta Birth Anniversary: | Saam Tv

नाटक, मालिका लेखन यासोबतच त्यांनी 80 पुस्तके लिहिली.

Tarak Mehta Birth Anniversary: | Saam Tv

तारक मेहता यांना 2015 साली 'पद्मश्री' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Tarak Mehta Birth Anniversary: | Saam Tv

त्यांनी लिहिलेले गुजराती भाषेतील 'दुनिया ने उंधा चष्मा' सदर वाचकांना इतके भावले की त्याचीच पुढे मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' आज घरांघरात पोहोचली आहे.

Tarak Mehta Birth Anniversary: | Sam Tv