Chetan Bodke
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बबिता कायमच सोशल मीडियावर आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहते.
बबिता म्हणजेच मुनमुन दत्ताच्या फॅशनची सोशल मीडियावर नेहमीच जोरदार चर्चा होत असते.
नुकतंच बबिताने चाहत्यांसोबत एक हटके फोटोशूट शेअर केले आहे.
मुनमुनने शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये घागरा परिधान करत खूप सुंदर फोटो शेअर केले.
मल्टीकलर असलेल्या ह्या घागऱ्यामध्ये अभिनेत्री खूप सुंदर दिसत आहे.
सागर वेणी घालत, लूकला साजेसा मेकअप करून मुनमुनने आपला लूक पूर्ण केला आहे.
डोक्यावर बिंदी, ड्रेसला साजेसा गळ्यामध्ये नेकलेस परिधान करत मुनमुनने सुंदर फोटोशूट केले आहे.
मुनमुनच्या ह्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून तिच्या सौंदर्याचे कौतुक केले.