ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
शरीरात व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास आपण अनेक आजारांना बळी पडू शकतो. यासाठी या लक्षणांना दुर्लक्ष करु नका.
स्नायूंना बळकट करण्यासाठी आणि हाडांना मजबूत करण्यासाठी व्हिटॅमिन डी गरजेचे आहे.
व्हिटॅमिन डीची कमतरता असल्यास ऑस्टियोपोसोसिस, फ्रॅक्चर आणि हाडांचे कमजोर होणे अशा आजारांचा धोका वाढतो.
व्हिटॅमिन डी ची कमतरता असल्यास रोगप्रतिकारशक्ती कमजोर होते. आणि व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.
याचा परिणाम मानसिक आरोग्यावर देखील होतो. तसेच डिप्रेशन आणि मूड स्विंग्स सारख्या आजाराचा धोका वाढतो.
व्हिटॅमिन डीचे प्रमाण वाढवण्यासाठी कोवळा सूर्यप्रकाश हा महत्वपूर्ण स्त्रोत आहे.
व्हिटॅमिन डीचे प्रमाण वाढवण्यासाठी दूध, मासे आणि अंडी यांचा रोजच्या आहारात समावेश करावा.