साम टिव्ही ब्युरो
आधुनिक, स्पर्धात्मक व धावपळीच्या जीवनात आपले शरीर व मन खूप थकून जाते. त्यामुळे ताण-तणाव वाढून, मानसिक आरोग्य बिघडते.
अशा परिस्थितीत शरीर आणि मनाला स्थिर व सुदृढ आरोग्यदायी राखण्यासाठी ध्यान-धारणा, प्राणायाम व योगासने सर्वोत्तम उपाय आहे.
यासाठी शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी शास्त्रीय मार्गदर्शन होणे अंत्यत गरजेचे आहे.
म्हणूनच ‘सकाळ माध्यम समूहा’तील ‘वुई आर इन धिस टुगेदर’ मोहिमेअंतर्गत ९ ते ११ डिसेंबर असे तीन दिवस संपूर्ण आरोग्यासाठी ‘स्वास्थ्यम्’ उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
‘स्वास्थ्यम्’ उपक्रमाच्या माध्यमातून विविध क्षेत्रांतील अनेक आरोग्यविषयक नामंवत तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन होणार आहे.
मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखण्यासाठीच्या ‘स्वास्थ्यम्’ या नावीन्यपूर्ण उपक्रमात सर्व वयोगटातील आणि विविध क्षेत्रातील नागरिक सहभागी व्हावे.