ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आयुषी टिळक अधिक हिंदी मालिकांमध्ये काम करताना दिसून येते.
अभिनयासह तिच्या सौंदर्यावरही लाखो लोक फिदा आहेत.
आयुषीने बंगाली साडीमधील काही लुक शेअर केले आहेत आणि इंटरनेटवर आग लावली आहे.
आयुषीने शेअर केलेल्या लाल साडीतील हा लुक अत्यंत आकर्षक आणि प्रभावी असून तिची ही अदा नक्कीच कातिलाना आहे.
केसांना भांग पाडत आयुषीने या साडीवर सुंदर आंबाडा हेअरस्टाईल केली असून यामध्ये लाल रंगाची गुलाबाची फुलं माळली आहेत.
आयुषीने कानात, हातात आणि गळ्यात डिजाईनर हेव्ही दागिने घातले असून तिच्या साडीसह हे परफेक्ट दिसत आहेत.
हेव्ही मेकअपचा आधार घेत तिने विंग्ड आयलायनर, गडद काजळ लावले असून तिच्या डोळ्यांचा आकार यामध्ये अत्यंत सुंदर दिसतोय.