Manasvi Choudhary
स्वयंपाक करताना चांगल्या दर्जाचे आणि आरोग्यासाठी सुरक्षित तेल निवडणे अत्यंत महत्त्वाचे असते, कारण आजकाल बाजारात विविध प्रकारचे तेल उपलब्ध आहेत. पण अनेक महिलांना स्वयंपाकासाठी कोणते तेल वापरावे असा प्रश्न पडतो.
स्वयंपाकघरात जेवण बनवण्यासाठी वेगवेगळ्या तेलांचा वापर केला जातो. यामध्ये सूर्यफूल तेल आणि सोयाबीन तेल हे दोन तेल वापरले जातात.
मात्र अनेकदा महिलांना प्रश्न पडतो की, सूर्यफुल आणि सोयाबीन या दोन्ही तेलापैकी नेमके कोणते तेल आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
सूर्यफूल तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी एसिड्सचे असते
सूर्यफूल तेल शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यास मदत करते.
सोयाबीन तेलामध्ये ओमेगा-६ फॅटी एसिड्स आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स भरपूर प्रमाणात असतात.
सोयाबीन तेल शरीराला उर्जा देते
पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.