Sunday Special Breakfast: सन्डे स्पेशल गुलाबी 'बीटरूट इडली'

Manasvi Choudhary

इडली

नाश्त्याला इडली खायला सर्वानाच आवडते. मात्र नेहमीच पांढरी इडली खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्ही ही नवीन रेसिपी नक्की ट्राय करा.

Idli Recipe

बीटरूट इडली

नाश्त्यासाठी स्पेशल बीटरूट इडली तुम्ही घरीच बनवू शकता. बीटरूट इडली बनवण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

Beetroot Idli Recipe

साहित्य

बीटरूट इडली बनवण्यासाठी इडली पीठ,बीट, हिरवी मिरची, आलं पेस्ट, कढीपत्ता मोहरी, उडीद डाळ, हिंग तेल, मीठ हे साहित्य घ्या.

easy idli recipe

बीटची पेस्ट करा

इडली बनवण्यासाठी सर्वातआधी बीटची साल काढून त्याचे छोटे तुकडे करा. हे तुकडे मिक्सरमध्ये बारिक वाटून घ्या.

Beetroot | yandex

मिश्रण तयार करा

एका मोठ्या बाऊलमध्ये इडली पीठ घ्या. नंतर त्यात तयार बीटची पेस्ट मिक्स करा आणि मिश्रण बाजूला ठेवा.

Beetroot Idli Recipe | Google

फोडणी तयार करा

गॅसवर पॅनमध्ये गरम तेलात मोहरी, उडीद डाळ, हिंग, कढीपत्ता, आलं- मिरची पेस्ट मिक्स करा. फोडणी तयार केल्यानंतर इडलीच्या पिठात मिक्स करा. संपूर्ण मिश्रण एकजीव करा.

Fodni

इडली तयार करा

इडलीच्या पिठामध्ये मीठ घाला आणि संपूर्ण मिश्रण नीट ढवळून घ्या. इडलीच्या भांड्यामध्ये थोडे तेल लावून त्यात बीटरूट इडलीचे मिश्रण ओता. आणि वाफवून घ्या. अशाप्रकारे घरच्या घरी तुम्ही बिटरूट इडली तयार होईल

Beetroot Idli Recipe

NEXT: वजन कमी करण्यापासून ते पचनक्रिया सुधारणेपर्यंत बडीशेपचे पाणी पिण्याचे 5 जबरदस्त फायदे

Fennel Seeds Drink Benefits
येथे क्लिक करा...