Manasvi Choudhary
उन्हाळ्यात थंड पदार्थाचे सेवन केले जाते. उष्ण वातावरणामुळे थंडगार पदार्थ खावेसे वाटतात.
अनेकजण फ्रिजमधील थंड दही आवडीने खातात. दही खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो.
पण तुम्हाला माहितीये का? दही उष्ण पदार्थ आहे. यामुळे अनेकजण उन्हाळ्यात दही खाणे टाळतात.
दह्यामध्ये पाण्याचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकून राहते.
दह्याचे सेवन केल्याने उन्हामुळे काळवंडलेली त्वचा आणि मुरुमांच्या समस्या कमी होण्यास मदत होते.
दही खाण्यासाठी दुपारची वेळ सर्वोत्तम आहे. दुपारच्या जेवणात दह्याचा समावेश केल्याने अन्नाचे पचन नीट होते आणि दुपारच्या उन्हाचा त्रास कमी होतो.
आयुर्वेदाम्यानुसार रात्री दही खाणे टाळावे. रात्री दही खाल्ल्याने कफ, सर्दी किंवा सांधेदुखीचा त्रास उद्भवू शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.