Rohini Gudaghe
कोकम फळ, साखर किंवा गूळ, पाणी, जिरे पावडर, आले पावडर, मीठ.
कोकम सरबत बनविण्यासाठी कोकम 2 ते 3 तास पाण्यात भिजत ठेवा.
पाण्यात व्यवस्थित भिजल्यानंतर कोकम फळातील बिया काढून टाका.
त्यानंतर भिजलेल्या कोकमला 10-15 मिनिटं पाण्यात उकळा.
चवीनुसार आता या मिश्रणात साखर किंवा गूळ घालून ढवळा.
सरबताची चव वाढवण्यासाठी जिरे पावडर आणि आले पावडर (आवडीनुसार) घाला.
आता हे मिश्रण थंड होऊ द्या. नंतर ते चाळणीतून गाळून घ्या.
तयार झालेलं कोकम सरबत फ्रिजमध्ये ठेवा. थंडगार सर्व्ह करा.