साम टिव्ही ब्युरो
बॉलिवूडचा बादशाहा शाहरूख खान ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे.
शाहरूखच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांसह त्याच्या कुटुंबियानी अनोख्या अंदाजात शुभेच्छा दिल्या आहेत.
मुलगी सुहाना खान हिने वडीलांसाठी खास शुभेच्छा दिल्या आहेत.
सुहानाने एक थ्रोबॅक फोटो शेअर करत अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत.
लहानपणीचा कधी न पाहिलेला फोटो सुहानाने शेअर केला आहे.
फोटो शेअर करत सुहानाने 'हॅपी बर्थडे माय बेस्ट फ्रेंड, लव्ह यू द मोस्ट' असं म्हटंल आहे.
सुपरस्टार शाहरूख खानचे आणि मुलगी सुहाना खानचे नाते हे मित्र-मैत्रीणीसारखं आहे.