Manasvi Choudhary
साखर ही आपल्या आहारातील महत्त्वाचा घटक आहे.
चहा-कॉफी, गोड पदार्थ किंवा कोणतेही पॅकेट फूड, बेकरी प्रॉडक्ट यांमधून साखर ही शरीरात पोहोचते.
मात्र जर तुम्ही १५ दिवस साखर खाल्ली नाही तर काय होते ते जाणून घ्या.
साखरेमध्ये कॅलरीज भरपूर प्रमाणात असतात ज्यामुळे शरीरातील चरबी वाढण्यात मदत होते.
आरोग्य तज्ञांच्यामते, साखरयुक्त पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी बिघडते आणि मधुमेहाचा धोका वाढतो.
शरीरातील निओपेप्टाईड शुगरमुळे वाढते आणि त्यामुळे आपल्याला एकप्रकारचा थकवा किंवा आळस येतो. पण साखर बंद केली तर हा घटक वाढणार नाही आणि फ्रेश वाटण्यास मदत होईल.
साखर न खाल्ल्याचा आणखी एक महत्त्वाचा परीणाम म्हणजे सौंदर्यात भर पडेल. त्वचा चमकदार आणि नितळ होण्यास साखर न खाण्याचा चांगला फायदा होतो