सापापेक्षाही विषारी असतात 'अशा' व्यक्ती; चुकूनही मैत्री करू नका

Surabhi Jagdish

महान अर्थशास्त्रज्ञ

चाणक्य हे भारताचे महान अर्थशास्त्रज्ञ मानले जातात. चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात जीवनातील समस्या स्पष्ट केल्यात.

निती शास्त्र

चाणक्यांनी आपल्या निती शास्त्रात काही लोकांचे वर्णन सापांपेक्षाही जास्त विषारी आहेत.

श्लोक

चाणक्य नीतीमध्ये एक श्लोक आहे - दुर्जनेषु का सर्पेषु वरम सर्पो न दुर्जनः. सर्प दंश केलां दुर्जनस्तु पडे-पडे ॥ या श्लोकात सापाचे वर्णन दुष्ट माणसापेक्षा श्रेष्ठ असं केलंय

श्लोकाचा अर्थ

या श्लोकाचा अर्थ असा आहे - दुष्ट आणि साप यांच्यातील फरक पाहिला तर दोघांमध्ये साप श्रेष्ठ आहे. कारण साप एकदाच चावतो. पण दुष्ट माणूस प्रत्येक पावलावर चावतो.

मित्र आणि सहकारी

या श्लोकात समजावण्याचा प्रयत्न केलाय की, एखाद्या व्यक्तीला आपले मित्र आणि सहकारी बनवण्याआधी त्याच्या वागणुकीबद्दल जाणून घेतलं पाहिजे.

आयुष्य उद्ध्वस्त

जर तुम्ही एकदा वाईट माणसाच्या संगतीत आलात तर तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. भविष्यात तुम्ही अडचणीत येऊ शकता.

अशा व्यक्तीपासून नेहमी दूर रहा

वाईट माणसाची वृत्ती कधीच बदलत नाही. तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुमचे लहान-मोठे नुकसान करू शकतो.