Shraddha Thik
जीवनसत्त्वे आणि खनिजे असलेले पदार्थ खाणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे शरीर निरोगी तर राहतेच शिवाय आजारांपासूनही बचाव होतो.
पोट निरोगी ठेवण्यासाठी जीवनसत्त्वे महत्त्वाची भूमिका बजावतात, असे आरोग्यतज्ज्ञ सांगतात.
व्हिटॅमिन बी 3 खूप महत्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन बी 3 निकोटीनिक ऍसिड म्हणून देखील ओळखले जाते. हे जीवनसत्व चयापचय प्रक्रियेसाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
अन्नाचे उर्जेमध्ये रूपांतर करण्याचे काम करते. हे पोट आणि पाचक प्रणाली दोन्हीसाठी आवश्यक आहे. अशा स्थितीत तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी 3 असलेल्या पदार्थांचाही समावेश करावा.
18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पुरुषांना दररोज 16 मिलीग्राम व्हिटॅमिन बी 3 आणि महिलांना 14 मिलीग्राम व्हिटॅमिन बी 3 ची आवश्यकता असते. तर गर्भवती महिलांसाठी त्याचे प्रमाण 18 मिग्रॅ असावे.
लोकांचा आहार चांगला नाही किंवा त्यांना पूर्ण पोषक तत्वे मिळत नाहीत अशा लोकांमध्ये व्हिटॅमिन B3 ची कमतरता दिसून येते.
त्याच वेळी, जे लोक जास्त मद्यपान करतात किंवा ज्यांना कार्सिनॉइड सिंड्रोमचा त्रास आहे त्यांना सर्वात जास्त धोका असतो.