Saam Tv
नवे वर्ष सुरू झाले आहे. नव्या वर्षात योग्य आहार ठेवणे आणि फिट राहणे हे एक उत्तम ध्येय आहे.
पुढील टिप्स आणि संपुर्ण डाएट प्लान तुम्ही फॉलो केलात तर तुम्ही येणारी अनेक वर्ष फीट अॅंड फाइन राहू शकाल.
पाणी पिणे, शाकाहारी किंवा मांसाहारी आहाराचे सेवन आणि व्यायाम या सवयी लावा.
तुम्ही ८ वाजता उपमा, पोहे, ओट्स, फळं, ड्रायफ्रूट्स, शहाळं, चहा किंवा कॉफी (कमी साखर) कमी प्रमाणात सेवन करा.
१० वाजता सफरचंद, केळी, पेरू, मोसंबी, नट्स, तिळ, छास सेवन करा.
भाजलेले चणे, ताज्या फळांचा रस संध्याकाळच्या स्नॅक्समध्ये घ्या.
सकाळी - २५% आहार, मध्याह्न - ३०% आहार, संध्याकाळी - २०% आहार अशा पद्धतीने आहाराचे सेवन करा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.