ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
KGF चित्रपटात साऊथ अभिनेत्री श्रीनिधी शेट्टीने यशसोबत मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटाच्या यशामुळे श्रीनिधी खुपच चर्चेत आली आहे.
KGF चित्रपटात यश आणि श्रीनिधीची लव स्टोरी फारच रंगली.
अभिनेत्री Miss Diva Super National 2016 स्पर्धेची विजेती आहे.
श्रीनिधीने आपल्या सौंदर्याने नेहमीच सर्वांना घायाळ केलं आहे. ती Miss Diva SuperNational जिंकणारी दुसरी भारतीय आहे.
अभिनेत्रीला KGF: Chapter 1 साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून 8व्या SIIMA सोहळ्यादरम्यान सन्मानित करण्यात आलं होतं.
यासोबतच तिला 66 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारही मिळाला आहे.