Spring Rolls Recipe: संध्याकाळी टेस्टी खाण्याची इच्छा होते? मग झटपट बनवी स्प्रिंग रोल्स, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

स्प्रिंग रोल शीट्स, बारीक चिरलेला कोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा, स्प्रिंग ओनियन, सोया सॉस, मिरपूड आणि चवीनुसार मीठ घ्या.

Spring Roll Recipe

भाज्या परतून घ्या

कढईत थोडे तेल गरम करून कांदा, गाजर, कोबी आणि शिमला मिरची घाला. भाज्या जास्त शिजवू नका; त्यांचा थोडा क्रंच राहू द्या.

Veg Spring Roll Recipe

सॉस आणि मसाले घाला

भाज्यांमध्ये सोया सॉस, मिरपूड आणि आवश्यकतेनुसार मीठ घालून सर्व साहित्य व्यवस्थित मिसळा. गॅस बंद करून मिश्रण थंड होऊ द्या.

Paneer Spring Roll

रोलमध्ये स्टफिंग भरा

स्प्रिंग रोल शीट घ्या आणि त्यावर तयार केलेले भाजीचे मिश्रण ठेवा. शीटच्या कडा आत दुमडून घट्ट रोल करा.

Paneer Spring Roll

कडा सील करा

मैदा आणि पाण्याची घट्ट पेस्ट तयार करून रोलच्या कडांना लावा. यामुळे रोल तळताना उघडणार नाही.

spring roll | yandex

स्प्रिंग रोल तळा

कढईत तेल गरम करून रोल्स मध्यम आचेवर सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा. तयार रोल्स टिश्यू पेपरवर काढा.

Paneer Spring Roll

गरमागरम सर्व्ह करा

तयार क्रिस्पी स्प्रिंग रोल्स टोमॅटो सॉस, चिली सॉस किंवा शेजवान चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.

spring roll | yandex

Hair Care: 2 वॉशमध्ये केस होतील सॉफ्ट आणि सिल्की; घरी तयार करा हा हेल्दी हेअर मास्क

Hair Care | Saam Tv
येथे क्लिक करा