Bharat Jadhav
हिंदू धर्मात, तुळशी आणि वडासह अनेक वनस्पतींची पूजा केली जाते. पिंपळाचे झाड देखील त्यापैकीच एक आहे. पण तुम्हाला माहिती आहे का पिंपळाच्या झाडाची पूजा शनिवारीच का केली जाते?
पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याचे काय फायदे आहेत, ते जाणून घेऊ.
पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू, फांद्यांमध्ये कृष्ण भगवान वास करतात, म्हणून या झाडाची पूजा करणं शुभ असतं.
पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने मागील जन्मातील आणि या जन्मातील पापे हळूहळू नष्ट होतात.
पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने एखाद्या व्यक्तीवरील नकारात्मक प्रभाव निघून जात असतो, अशी मान्यता आहे.
शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने शनिदेवाच्या वक्र दृष्टीपासून मुक्ती मिळते.
शास्त्रानुसार, जर एखाद्याच्या कुंडलीत पितृदोष असेल तर त्यांनी शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी.
जे लोक पिंपळाच्या झाडाची पूजा करतात त्यांना आजार आणि दुःखांपासून मुक्तता मिळत असते, असं मानले जाते.
शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने लक्ष्मी देवीचा आशीर्वाद मिळतो. त्यांना कधीही धनाची कमतरता भासत नाही.
शास्त्रांनुसार, सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा करू नये, कारण त्या वेळी पूजा केल्याने गरिबी येत असते. त्यामुळे सूर्योदयानंतर पिंपळाच्या झाडाची पूजा करावी.
ही माहिती वाचकांच्या धार्मिक पुस्तकांच्या आधारे घेण्यात आलीय. साम टीव्ही या गोष्टींना दुजोरा देत नाही.