ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पुढच्या आठवड्यात बुधवारी घराघरात बाप्पाचे आगमन होणार आहे.
गणपतीला सर्वात जास्त आवडणारा पदार्थ म्हणजे मोदक.
गणपतीला २१ मोदक नैवेद्य म्हणून अर्पण करण्याची प्रथा आहे.
पण नेमके २१ मोदकच का? त्यापेक्षा कमी किंवा जास्त का नाही? असा प्रश्न तुम्हाला कधी ना कधी पडलाच असेल.
चला तर मग जाणून घेऊया २१ या अंकाचे नेमके महत्त्व काय आहे.
२१ हा अंक पूर्णत्व, समृद्धी आणि मंगलतेचं प्रतिक मानला जातो.
हा अंक सत्व, रज, तम अशा एकूण तीन गुणांच्या सात स्वरूपांनी मिळून बनतो.
२१ हा अंक माणसाने मानवी जीवनातील सर्व गुणांचा योग्य समतोल साधावा असा संदेश देतो.
म्हणूनच बाप्पाला नेमके २१ मोदक किंवा २१ दुर्वांच्या जुड्या अर्पण केल्या जातात.