Lemon Soda Recipe: उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा मसालेदार लेमन सोडा; घरच्या घरी बनवा ही रिफ्रेशिंग ड्रिंक

Sakshi Sunil Jadhav

स्पेशल ड्रिंक

उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे शरीराला थंडावा देणारे आणि ताजेतवाने ठेवणारे पेय पिण्याची गरज असते. अशावेळी लेमन सोडा हा एक उत्तम पर्याय ठरतो.

Lemon Soda Recipe

काळे मीठ

लेमन सोडाला खास चव देण्यासाठी काळ्या मिठाचा वापर केला जातो. हे पचन सुधारण्यासही मदत करते.

Lemon Soda Recipe

भाजलेली जिरेपूड

भाजलेल्या जिऱ्याचा सुगंध आणि चव पेय अधिक रुचकर बनवते.

Lemon Soda Recipe

चाट मसाला

चाट मसाल्यामुळे लेमन सोडाला हलकी तिखट-आंबट चव मिळते.

Lemon Soda Recipe

काळी मिरी पावडर

काळी मिरी स्वाद वाढवण्याबरोबरच पचनासाठीही फायदेशीर ठरते.

Lemon Soda Recipe

साधे मीठ

चव संतुलित करण्यासाठी थोड्या प्रमाणात साधे मीठ वापरले जाते.

Lemon Soda Recipe

लेमन सोडासाठी लागणारे साहित्य

2 ताजे लिंबू, 2 ग्लास थंड सोडा, 2 ते 3 चमचे साखर किंवा मध, अर्धा चमचा काळे मीठ, अर्धा चमचा भाजलेली जिरेपूड, अर्धा चमचा चाट मसाला, चिमूटभर काळी मिरी पावडर, काही पुदिन्याची पाने, बर्फाचे तुकडे, लेमन सोडा इ.

Lemon Soda Recipe

रेसिपी

सर्वप्रथम ग्लासमध्ये लिंबाचा ताजा रस काढून त्यात साखर किंवा मध मिसळा. त्यानंतर सगळे मसाले आणि काळी मिरी घालून मिश्रण तयार करा.

Lemon Soda Recipe

कृती

आता बर्फाचे तुकडे आणि पुदिन्याची पाने टाका. शेवटी हळूहळू थंड सोडा ओता. वरून लिंबाची फोड आणि थोडा चाट मसाला घालून सर्व्ह करा.

Lemon Soda | Freepik

NEXT: कोकणी स्टाईल फणसाची भाजी खायचीये? फॉलो करा ही पद्धत

Raw Jackfruit Recipe
येथे क्लिक करा