Dhanshri Shintre
श्रावणात उपवास करत असाल आणि बटाट्याचा कंटाळा आला असेल तर, काही नवीन आणि वेगळ्या पदार्थांनी बदल करा.
साबुदाणा टिक्की आणि खिचडी खाल्ले आहेत, पण यंदा खास साबुदाणा पराठा बनवून स्वाद अनुभवून पाहा.
साबुदाणा प्रथम ४ ते ५ तास पाण्यात भिजवून ठेवा, जेणेकरून तो मऊ आणि चवदार बनेल.
भिजवलेल्या साबुदाण्यामध्ये उकडलेले बटाटे मॅश करा, त्यात हिरवी मिरची आणि कोथिंबीर चिरून मिसळा.
तसेच त्यात काळी मिरी पूड, लिंबाचा रस आणि खडे मीठ चांगले मिसळून स्वाद वाढवा.
जर मिश्रण सैल वाटत असेल, तर त्यात राजगिरी पिठ मिसळून घट्ट करा.
हातांना तेल लावून मिश्रणाचा गोळा प्लास्टिक फॉइलवर ठेवा, हाताने थापून त्याला पराठ्याचा आकार द्या.
गरम तव्यावर पराठा ठेवा, दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत भाजा आणि पौष्टिक साबुदाणा पराठा तयार करा.