Soybean Chilla: नाश्त्यासाठी बनवा प्रोटीनयुक्त टेस्टी सोयाबीन चीला; फक्त १५ मिनिटांत तयार होणारी स्वादिष्ट रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य

१ कप सोयाबीन दाणे, १ कांदा बारीक चिरलेला, १ हिरवी मिरची, १ चमचा आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, मीठ, हळद आणि तेल.

Soybean Chilla Recipe

सोयाबीन भिजवून घ्या

सोयाबीन ६ ते ८ तास पाण्यात भिजत ठेवा. त्यानंतर पाणी काढून स्वच्छ धुवून घ्या.

Soybean Chilla Recipe

मिश्रण तयार करा

भिजवलेले सोयाबीन, हिरवी मिरची आणि आले-लसूण पेस्ट मिक्सरमध्ये वाटून गुळगुळीत पेस्ट तयार करा.

PaneSoybean Chilla Recipe

भाज्या मिसळा

तयार पेस्टमध्ये चिरलेला कांदा, कोथिंबीर, हळद आणि चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करा.

Soybean Chilla Recipe

चीला बनवण्याची प्रक्रिया

नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर थोडे तेल लावा. तयार मिश्रण डोश्याप्रमाणे गोल पसरवा.

Soybean Chilla Recipe | pinterest

दोन्ही बाजूंनी भाजून घ्या

मध्यम आचेवर चीला दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. त्यामुळे तो कुरकुरीत आणि स्वादिष्ट लागतो.

Soybean Chilla Recipe | Saam tv

गरमागरम सर्व्ह करा

तयार सोयाबीन चीला हिरवी चटणी, टोमॅटो सॉस किंवा दह्यासोबत सर्व्ह करा. हा पौष्टिक नाश्ता मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल.

Soybean Chilla Recipe

Glowing Skin Tips: फ्रिजमधील या ४ गोष्टींनी परत मिळवा त्वचेचा हरवलेला ग्लो; जाणून घ्या ७ सोपे उपाय

Glowing Skin Tip
येथे क्लिक करा