Priya More
दाक्षिणात्य सुपरस्टार अशोक सेल्वन आज विवाहबंधनात अडकला.
अशोक सेल्वनने अभिनेत्री कीर्ती पांडियनसोबत लग्न केले. हे कपल खूपच फेमस आहे.
अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर आज अशोक आणि कीर्ती यांनी लग्न केले.
अशोक आणि कीर्तीच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्नामध्ये अशोक आणि कीर्ती दोघेही ऑफ व्हाईट रंगाच्या पारंपारिक पोषाखामध्ये खूपच सुंदर दिसत होते.
लग्नाचे फोटो समोर आल्यानंतर दोघांच्याही चाहत्यांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अशोक आणि कीर्ती यांनी चेन्नईमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीला सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी उपस्थिती लावणार आहेत.
अशोक सेल्वनने तमिळ चित्रपट 'सुथु कव्वुम'मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्याने आतापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत.
अभिनेत्री कीर्ती पांडियन ही अभिनेता आणि चित्रपट निर्माते अरुण पांडियन यांची मुलगी आहे.