Shruti Vilas Kadam
अभिनेत्री साई पल्लवी साऊथसह संपूर्ण भारतात तिच्या सध्या स्वभावासाठी आणि उत्तम अभिनयासाठी प्रसिद्ध आहे.
साई पल्लवी प्रत्येक चित्रपटासाठी ३ कोटी ते ६ कोटी इतके मानधन घेते.
साई पल्लवीने अनेक व्यावसायिक जाहिरातींना नकार दिला आहे, त्यामुळे तिची नेटवर्थ इतर अभिनेत्रींपेक्षा तुलनेने कमी आहे.
तिचे कोयंबतूर येथील घर आणि इतर मालमत्ता तिच्या संपत्तीचा भाग आहेत.
"अमरन" या चित्रपटाच्या यशानंतर तिने मानधन वाढवले असून, आगामी "रामायण" चित्रपटासाठी ६ कोटी मानधन घेतल्याची माहिती आहे.
साई पल्लवी साध्या जीवनशैलीला प्राधान्य देते आणि फॅशन किंवा लक्झरी वस्तूंवर फारसा खर्च करत नाही.
साई पल्लवी आपल्या कमाईचा एक भाग सामाजिक कार्यांसाठी देणगी स्वरूपात देते, ज्यामुळे तिच्या संपत्तीचा काही भाग समाजसेवेसाठी वापरला जातो.
२०२५ च्या सुरुवाती साई पल्लवीची एकूण संपत्ती अंदाजे सुमारे ४७ कोटी असल्याचा अंदाज आहे.