साम टिव्ही ब्युरो
प्रियामणी साऊथमधील अभिनेत्रीपैकी एक आहे.
प्रियामणीने साऊथसह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे.
प्रियामणीने तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने स्वत:चा मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
प्रियामणी कन्नड, मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपटांमध्येही काम केले आहे.
प्रियामणीने करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती. तिने कांचीपुरम सिल्क, इरोड सिल्क आणि लक्ष्मी सिल्कसाठी अगदी लहान वयात मॉडेलिंग केले.
प्रियामणी ही बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनची चुलत बहीण आहे हे फार कमी लोकांना माहिती आहे.
प्रियामणी 'मैदान' सिनेमात अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे.
प्रियामणीने 'द फॅमिली मॅन'च्या पहिल्या आणि दुसऱ्या भागात मनोज वाजपेयीच्या पत्नीची भूमिका साकारली होती.