ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सोनम कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सोनम कपूरने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
सोनम कपूर ही नेहमीच काही न काही कारणांमुळे चर्चेत असते. परंतू ती चार वर्ष काही कारणास्तव चित्रपटसृष्टीपासून लांब होती.
सोनम कपूरचा 'ब्लांइड' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटातून सोनम पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे.
नुकताच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. टीझरला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे.
यात सोनम अंध व्यक्तीची भूमिका साकारणार आहे.