साम टिव्ही ब्युरो
मनोरंजविश्वातलं सोनाली हे नावं कोणाला माहीत नाही असं शक्यचं नाही
महाराष्ट्राची ‘अप्सरा’ आणि ‘हिरकणी’ फेम अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.
सोनालीने तिच्या अभिनयातून आणि नृत्याच्या अदाकारीतून मराठी चित्रपटसृष्टीत तिचा एक वेगळाच ठसा उमटवला आहे.
सोशल मीडियावर सोनाली नेहमीच सक्रिय असल्याचे पहायला मिळते.
विविध लूक्समधील फोटो आणि आगामी प्रोजेक्टसच्या पोस्ट ती नेहमी शेअर करताना दिसते.
नुकतेच सोनालीने तिचे साडीतले खास अदांजातले नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
लग्न म्हटलं की आठवणींचा खजिना. आणि ह्या आठवणी सुंदर बनवण्यासाठी सोनाली पैठणी घेऊन येत आहे असं तिने म्हटंल आहे
सोनालीचं 'सोनाली पैठणी' असं साड्याचं “लग्न कलेक्शन” मार्केट मध्ये आलं आहे.
सोशल मीडियावर सोनालीचे फोटो फाहून चाहते प्रतिक्रिया देत आहेत.