Shivani Tichkule
मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी.
सोनालीने अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.
सोनालीच्या आगामी चित्रपटांविषयी किंवा खासगी आयुष्याविषयी जाणून घेण्यासाठी नेहमीच सर्वजण उत्सुक असतात.
नुकतेच सोनालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
या फोटोमध्ये सोनालीने रेड वाइन रंगाची सुंदर साडी परिधान केली आहे.
लूक पूर्ण करण्यासाठी तिने गळ्यात मोठे नेकलेस परिधान केले आहे.
सोनालीचा हा लूक तिच्या चाहत्यांना खूप आवडला आहे.
सोनालीच्या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटचा पाऊस होत आहे.