Manasvi Choudhary
सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित आहे.
सोमवारी महादेवाची भक्तिभावाने पूजा केल्यास प्रसन्न वाटते.
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी आराधना केली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार सोमवारी खास उपाय केल्यास महादेव प्रसन्न होऊन भक्तांवरचे संकट दूर करतात.
सोमवारी महादेवाची आराधना केल्यास महादेव प्रसन्न होतात. सोमवारी ब्रम्ह मुहूर्तावर महादेवाचे ध्यान करा
शास्त्रानुसार, चंदन महादेवाला फार प्रिय आहे. सोमवारी पूजा केल्यानंतर महादेवाला चंदन अर्पण करा.
गंगा जलमध्ये धोतऱ्याचं फूल पान, अक्षता आणि दूध मिसळावे. या दिवशी भोलेनाथाचा अभिषेक केल्यास महादेव प्रसन्न होतात.
सोमवारी महादेवाच्या पूजेच्यावेळी १०८ वेळा महामृत्यूंजय जप करा. असे केल्यास महादेवाची कृपा प्राप्त होते.
हिंदू धर्मात दान धर्माला विशेष महत्व आहे. सोमवारी पांढऱ्या रंगाला विशेष महत्व आहे. त्यामुळे पांढऱ्या रंगाच्या खाद्यपदार्थांचं दान करणं शुभ मानलं जातं.