Solkadhi Recipe: पारंपरिक कोकणी सोलकढी घरी कशी बनवायची, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार ठेवा

सोलकढीसाठी कोकम, घट्ट नारळाचे दूध, हिरवी मिरची, लसूण, जिरे, मीठ आणि कोथिंबीर ही मुख्य साहित्ये लागतात.

Solkadhi Recipe | yandex

कोकम भिजत ठेवा

कोकम १५–२० मिनिटे कोमट पाण्यात भिजवा, जेणेकरून त्याचा सुंदर रंग आणि आंबटपणा पाण्यात उतरतो.

Solkadhi Recipe | Saam Tv

नारळाचे दूध तयार करा

ताज्या किसलेल्या नारळात थोडे कोमट पाणी घालून घट्ट दूध काढा. सोलकढी चवदार होण्यासाठी दूध घट्ट असणे महत्त्वाचे आहे.

Solkadhi Recipe | Saam Tv

मसाल्याची पेस्ट बनवा

हिरवी मिरची, लसूण आणि जिरे एकत्र वाटून बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट सोलकढीला खास चव देते.

Solkadhi Recipe | Saam Tv

सर्व साहित्य एकत्र करा

एका भांड्यात नारळाचे दूध, कोकम पाणी, तयार मसाल्याची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून हलक्या हाताने मिसळा.

Solkadhi Recipe | Saam Tv

फोडणी देऊ नका, कच्चीच ठेवा

सोलकढीला फोडणी देत नाहीत. कच्ची ठेवली तर तिची थंडावा देणारी आणि पचनास मदत करणारी गुणधर्म टिकून राहतात.

Solkadhi Recipe | Saam Tv

कोथिंबीर घालून सर्व्ह करा

वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सोलकढी थंडगार सर्व्ह करा. जेवणानंतर सोलकढी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.

solkadhi recipe

White Saree Contrast Blouse: पांढऱ्या रंगाच्या साडीवर उठून दिसतील हे 7 ट्रेंडी आणि सुंदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज

White Saree Contrast Blouse | Saam tv
येथे क्लिक करा