Sakshi Sunil Jadhav
सूर्यग्रहण ज्योतिषशास्त्रांमध्ये खूप महत्वाचे मानले जाते. या दिवशी अनेक गोष्टींमध्ये बदल होतात असं म्हंटलं जातं.
सूर्यग्रहणावेळी लहान मुलांच्या सुरक्षिततेची विशेष खबरदारी घेणं गरजेचं आहे. अनेक पालकांना काही महत्वाच्या गोष्टी माहितच नसतात. मग पुढची माहिती नक्कीच वाचा
सूर्यग्रहणावेळी चंद्र पृथ्वी आणि सूर्याच्या मध्ये येतो आणि सूर्याचा काही भाग किंवा पूर्ण भाग झाकला जातो. या वेळी सूर्याची तीव्र किरणे थेट डोळ्यांवर पडू शकतात.
सूर्याकडे थेट पाहिल्यास रेटिनाला काही सेकंदांत इजा होऊ शकते. यामुळे ‘रेटिना बर्न’ होण्याचा धोका असतो आणि त्यावेळी वेदना जाणवत नाहीत.
डोळ्यांना त्रास, प्रकाश सहन न होणे किंवा डोकेदुखी अशी लक्षणे दिसू शकतात. गंभीर अवस्थेत दृष्टी धूसर होणे किंवा काळे डाग दिसणे शक्य आहे.
मुलांना ग्रहण दाखवताना ISO 12312-2 प्रमाणित सोलर इक्लिप्स ग्लासेस वापरणं खूप गरजेचं आहे. साधे सनग्लासेस अजिबात सुरक्षित नाहीत.
कॅमेऱ्याने, बायनॉक्युलरने किंवा दुर्बिणीतून ग्रहण पाहणं धोकादायक ठरु शकतं. या उपकरणांमुळे सूर्यकिरण जास्त तीव्र होतात आणि डोळ्यांना मोठं नुकसान होऊ शकतं.
पिनहोल प्रोजेक्टरच्या मदतीने भिंतीवर प्रतिमा पाहणं हा सुरक्षित मार्ग आहे. तसेच टीव्ही किंवा ऑनलाइन थेट प्रक्षेपणाद्वारे ग्रहण पाहणे अधिक सुरक्षित ठरते.
ग्रहण पाहण्यासाठी बाहेर जाताना टोपी, पूर्ण बाह्यांचे कपडे आणि सनस्क्रीन वापरावा. डोळ्यांसोबत त्वचेचेही रक्षण करणे गरजेचे आहे.
ग्रहणाच्या काळात मुलांना उपाशी ठेवू नका. आधीच जेवण देऊन पुरेसे पाणी, ज्यूस किंवा नारळपाणी द्या.
ग्रहणानंतर मुलांना दृष्टीबाबत कोणताही त्रास जाणवल्यास तातडीने नेत्रतज्ज्ञांकडे जावे. वेळेवर उपचार घेतल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात.